Pakistani Doctor Scandal : ब्रिटनच्या ग्रेटर मँचेस्टर येथील टेमसाईड जनरल हॉस्पिटलमध्ये (UK Hospital) काम करणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या (Pakistani Doctor) भूलतज्ज्ञावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. .डॉ. सुहेल अंजुम यांनी एका रुग्णाच्या पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेच्या मध्यावर ऑपरेशन थिएटर सोडून दुसऱ्या नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ मधील असली, तरी अलीकडेच मँचेस्टर मेडिकल ट्रिब्यूनलच्या (Manchester Medical Tribunal) सुनावणीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला..शस्त्रक्रियेच्या मध्यावर डॉक्टर गायबअहवालानुसार, डॉ. अंजुम त्या दिवशी सलग पाच शस्त्रक्रियांमध्ये सहभागी झाले होते. तिसऱ्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांनी सहकाऱ्यांना विश्रांती घेत असल्याचे सांगितले. रुग्णाची देखरेख करण्यासाठी त्यांच्या जागी एक भूल देणारी नर्स ठेवण्यात आली. मात्र, अंजुम जवळच्या दुसऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये गेले आणि तिथे ते एका नर्ससोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसले..नर्सच्या नजरेस पडला प्रकारशस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणण्यासाठी दुसरी नर्स त्या खोलीत गेली असता, तिने अंजुम आणि नर्सला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. अहवालानुसार, त्या वेळी नर्सचा स्कर्ट गुडघ्यापर्यंत खाली आला होता, तर डॉ. अंजुम स्वतःची पँट हाताळत होते..डॉक्टरांनी दिली कबुलीचौकशीदरम्यान डॉ. अंजुम यांनी कबूल केले, की ऑपरेशनदरम्यान रुग्ण सोडून दिल्याच्यावेळी त्यांचे त्या नर्ससोबत शारीरिक संबंध होते. त्यांनी न्यायाधिकरणात सांगितले की, “हा माझ्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ होता. आमच्या धाकट्या मुलाचा अकाली जन्म झाला आणि माझ्या पत्नीवर मोठा मानसिक आघात झाला. या तणावात मी मोठी चूक केली. मला या कृतीबद्दल प्रचंड खंत आणि लाज वाटते.”.राजीनामा देऊन सोडले ब्रिटनया घटनेनंतर, डॉ. अंजुम यांनी २०२४ मध्ये एनएचएस ट्रस्टमधील नोकरीचा राजीनामा दिला आणि ब्रिटन सोडून पाकिस्तानात परतले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.