26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईद 'टेरर फायनान्सिंग'मध्ये ठरला दोषी!

वृत्तसंस्था
बुधवार, 11 डिसेंबर 2019

सीटीडीने हफीज सईदला पाकिस्तानचा दहशतवादविरोधी कायदा (एटीए) 1997 अंतर्गत अटक केले होते.

लाहोर (पाकिस्तान) : पाकिस्तानातील एका दहशतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) बुधवारी (ता.11) मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जम्मत-उद-दावाचा (ज.यु.डी.) प्रमुख हाफिज सईद सह इतर चार नेत्यांना दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

यापूर्वी शनिवारी न्यायालयाते आरोपींपैकी एक आरोपी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 11 डिसेंबरपर्यंत तहकूब केली होती. आज (ता. 11) झालेल्या सुनावणीमध्ये सईदच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद सादर करत तो नोर्दोश असल्याचे सांगितले होते.

- #ISRO : पीएसएलव्हीचे अर्धशतक; 'इस्रो'चा RISAT-2BR1 उपग्रह अंतराळातून करणार हेरगिरी!

मात्र, यानंतर न्यायालयाने पंजाब दहशतवादविरोधी विभागाला साक्षीदारांना हजर न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश देत या खटल्याची कार्यवाही गुरूवारपर्यंत तहकूब केली आहे. 

सईदवर अल-अनफल ट्रस्ट, दावतुल इरशाद ट्रस्ट आणि मुआझ बिन जबल ट्रस्ट या ट्रस्टच्या नावाखाली लाहोर, गुजराणवाला आणि मुल्तानसह इतर शहरांमध्ये दहशतवादाकरता वित्तपुरवठा करण्यासाठी निधी उभारला गेल्याचा आरोप आहे.

- सुप्रिया सुळेंनी दाखवलेल्या चुकीवर अमित शहा म्हणतात 'कबूल'

पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) 17 जुलै रोजी सईद आणि त्याच्या 13 साथीदारांविरूद्ध पंजाब प्रांतातील विविध शहरांमध्ये दहशतवादासाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी 23 प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवले होते. यानंतर सीटीडीने हफीज सईदला पाकिस्तानचा दहशतवादविरोधी कायदा (एटीए) 1997 अंतर्गत अटक केले होते. सध्या सईद लाहोर येथील कोट लखपत कारागृहात आहे.

- सारा झाली शायर, रेखाजींशी स्वत: ची तुलना करत म्हणाली...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani militant Hafiz Saeed indicted on terror financing