#ISRO : पीएसएलव्हीचे अर्धशतक; 'इस्रो'चा RISAT-2BR1 उपग्रह अंतराळातून करणार हेरगिरी!

वृत्तसंस्था
Wednesday, 11 December 2019

रिसॅट-2बीआर1 उपग्रहाचे वजन 628 किलो असून रिसॅट-2बी मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. या वर्षाच्या सुरवातीला रिसॅट-2बीचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

चांद्रयान-2 मोहिमेनंतर भारताने आपली अवकाश मोहिम जोमाने पुढे सुरू ठेवली आहे. चांद्रयान-2 मोहिम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी त्यामुळे अवकाश क्षेत्रात भारताचा असणारा दबदबा काही कमी झालेला नाही, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने बुधवारी (ता.11) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून रडार इमेजिंग अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट रिसॅट-2बीआर1 चे प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे प्रक्षेपण पीएसएलव्ही रॉकेटद्वारे करण्यात आले. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे करण्यात आलेले हे 50 वे प्रक्षेपण ठरले आहे.

- भारताचा विकासदर मंदावणार : एडीबी

रिसॅट-2बीआर1 उपग्रहाचे वजन 628 किलो असून रिसॅट-2बी मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. या वर्षाच्या सुरवातीला रिसॅट-2बीचे प्रक्षेपण करण्यात आले होते. रिसॅट-2बी उपग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे हे उपग्रह प्रामुख्याने हेरगिरी करण्यासाठी वापरले जातात.

- विश्वसुंदरीचं बॉलिवूडमध्ये 10 वर्षांनी कमबॅक !

27 नोव्हेंबरला इस्रोने कार्टोसॅट-3 या उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. आज प्रक्षेपित करण्यात आलेल्या रिसॅट-2बीआर1 या उपग्रहासोबत आणखी 9 उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. यामध्ये सहा उपग्रह अमेरिका, इस्रायल, इटली आणि जपान यांचा प्रत्येकी एका उपग्रहाचा समावेश आहे. 

- 'त्या' मुलाला पाहून नुसरत जहां यांनी मारली मिठी !

चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेनंतर इस्रो गगनयान या पुढच्या मोहिमेच्या तयारीला लागले आहे. या मोहिमेंतर्गत इस्रो पहिल्यांदाच तीन भारतीयांना अवकाशात पाठविणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISRO successfully launches RISAT2BR1 with 9 foreign satellites