वय 55 अन् वजन 350 किलो; मृत्यू संशयास्पद...

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जुलै 2019

हसन यांना उपचारासाठी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कराच्या हेलिकॉप्टरने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

लाहोरः पाकिस्तानमधील सर्वाधिक वजन असलेल्या व्यक्तीचा आज (सोमवार) मृत्यू झाला आहे. नुरूल हसन (वय 55) असे त्यांचे नाव असून, 350 किलो एवढे त्यांचे वजन होते.

हसन यांना उपचारासाठी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कराच्या हेलिकॉप्टरने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हसन यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, याबाबतची माहित पुढे आलेली नाही. मात्र, हसन यांना उपचारासाठी ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णालमध्ये मारामारीची घटना घडली आहे. हसन यांच्यासह एका महिलेचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

हसन हे रिक्षाचालक होते, त्यांचे वजन वाढत जाऊन 350 किलो पर्यंत पोहचले होते. त्यांच्यावर उपचारासाठी 10 लाख रुपये खर्च सांगण्यात आला होता. सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल जावेद बाजवा यांनी पुढाकार घेऊन हेटिकॉप्टरने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, वजनामुळे नव्हे तर त्यांच्या मृत्यूमागे वेगळेच कारण आहे, मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistani noorul hassan 330kg wieght passes away at lahore