पत्रकाराला शेवटी म्हणाला; मी कोरोना पॉझिटिव्ह...

वृत्तसंस्था
Monday, 20 July 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचा वापर केला जात आहे. पण, एका पत्रकाराने मास्क न घालताच एकाला प्रश्न विचारला. समोरच्या व्यक्तीनेही उत्तर देऊन झाल्यावर मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पेशावर (पाकिस्तान) : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचा वापर केला जात आहे. पण, एका पत्रकाराने मास्क न घालताच एकाला प्रश्न विचारला. समोरच्या व्यक्तीनेही उत्तर देऊन झाल्यावर मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चिमुकल्याचा श्वास रोखून ठेवणारा व्हिडिओ पाहा...

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका न्यूज चॅनलचा पत्रकार पेशावरमधल्या वाढत्या पेट्रोलच्या किमतींवर नागरिकांची मते जाणून घेत होता. एका दुचाकीवर असलेल्या व्यक्तीला पत्रकार प्रश्न विचारू लागला. सुरुवातीला या व्यक्तीने शहरात पेट्रोल मिळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याने शेवटी पत्रकाराला सांगितले की, मी कोरोना पॉझिटिव्ह असून, रुग्णालयात जात आहे. या प्रश्नाचे उत्तरही दुचाकीस्वाराने दिले. पण, शेवटी त्याला जे उत्तर मिळाले ते ऐकून पत्रकारही घाबरला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

संबंधित व्हिडिओ अनस मलिकने ट्विटरवर शेअर केला आहे. अनस मलिकने पोस्ट केलेल्या माहितीनुसार, 'पत्रकाराचे नाव अदनान तारिक आहे, आणि तो पेशावरमध्ये बातमीदारी करतो.' दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या 2 लाख 63 हजार 496 रुग्ण आहेत. तर, 5 हजार 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 लाख 04 हजार 276 रुग्ण बरे झाले आहेत.

Video: बाळाने उघडला तिसरा डोळा पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistani reporter shocked when someone said im corona positive video viral