esakal | पाक टिकटॉक स्टारच्या मृत्यूची माहिती पत्नीने दिली पण...
sakal

बोलून बातमी शोधा

pakistani tiktok star adil rajputs wife fakes his death for followers

पाकिस्तानचा टिकटॉकस्टार आदिल राजपूत रहिम यार याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती त्याची पत्नी फरहाने दिली. यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठे दुःख झाले.

पाक टिकटॉक स्टारच्या मृत्यूची माहिती पत्नीने दिली पण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद (पाकिस्तान): पाकिस्तानचा टिकटॉकस्टार आदिल राजपूत रहिम यार याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती त्याची पत्नी फरहाने दिली. यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठे दुःख झाले. पण, काही वेळातच ही माहिती खोटी असल्याच्या समजल्यानंतर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

बलात्कार करणाऱयांना नपुंसक करायला हवेः इम्रान खान

आदिल राजपूत रहिम यार याचे सुमारे २ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर आहेत. आदिलची पत्नी फरहाने त्याच्या टिकटॉक खात्यातून एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या व्हिडिओत ती शोक करत असल्याचे दिसत आहे. ती व्हिडिओत म्हणाली की, 'आदिल आता आपल्यात राहिला नाही आदिलचा एका अपघातात मृत्यू झाल्याचा फोन आपल्याला आला. शिवाय, तिने अश्रूही ढाळले.' हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांत खळबळ उडाली. तसेच एका मशिदीने तर आदिलवरील अंत्यसंस्काराची घोषणा केली. या प्रकाराने चाहते हळहळले. काही जण सांत्वन करण्यासाठी आदिलच्या घरी पोचले तेव्हा तेथील चित्र पाहून त्यांना धक्काच बसला. आदिल जिवंत असल्याचे त्यांना समजले. चाहत्यांची नाराजी पाहून आदिलच्या पत्नीने सारवासारव करत पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात गैरसमजातून व्हिडिओ व्हायरल झाल्याचे ती म्हणते. पण, केवळ फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी तिने हा प्रकार केल्याची टीका चाहत्यांनी केली.