बलात्कार करणाऱयांना नपुंसक करायला हवेः इम्रान खान

वृत्तसंस्था
Tuesday, 15 September 2020

बलात्कार करणाऱयांना सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली पाहिजे अन्यथा नपुंसक करायला हवे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

लाहोर (पाकिस्तान): बलात्कार करणाऱयांना सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली पाहिजे अन्यथा नपुंसक करायला हवे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

Video: पाकची युवती म्हणतेय; ट्रम्पच माझे बाबा...

लाहोरजवळ राष्ट्रीय महामार्गावर एका महिलेवर दोन मुलांसमोरच सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली असून, अनेक महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. इम्रान खान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्रान खान म्हणाले, 'बलात्कार करणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली पाहिजे किंवा नपुंसक करायला हवे. ज्या प्रकारे खूनाच्या घटनेत फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री अशा पद्धतीने शिक्षा असते. त्याच पद्धतीने बलात्कार करणाऱ्या आरोपींना शिक्षा असायला हवी. यामध्ये फर्स्ट डिग्री क्रमवारी गुन्ह्यातील आरोपींना रासायनिक पद्धतीने नपुंसक करायला हवे. अनेक देशात अशा पद्धतींचा वापर केला जात असल्याचे वाचले आहे. बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपींना सार्वजनिक ठिकाणी फाशी दिल्यास असा गुन्हा करणाऱ्यांच्या मनात एक भीती निर्माण होईल.'  

पाकची युवती म्हणाली; मोदीजी मला लग्न करायचंय...

पाकिस्तानमधील पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान यांनी सांगितले की, 'महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पोलिसांनी शफाखत अली नावाच्या संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले आहे.' दरम्यान, गेल्या आठवड्यात लाहोरजवळ राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना महिलेची मोटार बंद पडली होती. त्यावेळी काही जणांनी मोटारीच्या काचा फोडत तिच्यावर हल्ला केला. शिवाय, या महिलेवर तिच्या दोन मुलांसमोचर सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेनंतर पाकिस्तानमधील प्रत्येक शहरात महिलांनी आंदोलने सुरु केली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan pm imran khan to call for chemical castration