पाक सैन्याला आता रशियात प्रशिक्षण

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि रशिया जवळ येत असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसते आहे. पाकिस्तानी सैनिकांना आता रशियातील लष्करी संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 

इस्लामाबाद- अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि रशिया जवळ येत असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसते आहे. पाकिस्तानी सैनिकांना आता रशियातील लष्करी संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

याबाबतच्या करारावर दोन्ही देशांनी मंगळवारी स्वाक्षऱ्या केल्या. पाकिस्तान आणि रशिया यांच्यातील संरक्षणविषयक संबंध वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे या करारातून स्पष्ट होत आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशिया आणि पाकिस्तान संयुक्त लष्करी सल्लागार समितीच्या बैठकीत दोन्ही देशांतील संरक्षण विषय सहकार्य विढविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीनंतर संबंधित करार प्रत्यक्षात आला. रशिया आणि पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Web Title: Pakistani troops to receive training at Russian military