'दिल्लीवाली'च्या तालावर नाचताहेत परवेझ मुशर्रफ

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

नवी दिल्ली/ इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुशर्रफ हे एका नाईट क्लबमध्ये 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 

दोन दिवसांपूर्वी हा सोशल मीडियावर शेअर होऊ लागला आणि पाहता पाहता एवढा व्हायरल झाला की तो चर्चेचा विषय बनला. 
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांच्या 'यह जवानी है दिवानी' या 2013 मधील चित्रपटातील 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड' हे गाजलेले गाणे पाकिस्तानचे माजी लष्करशहा मुशर्रफ यांना भलतेच भावलेले दिसते. एका अज्ञात तरुणीसोबत नाईट क्लबमध्ये नाचताना ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत. 

हा व्डिडिओ नेमका कधी आणि कुठे रेकॉर्ड करण्यात आला याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, मुशर्रफ यांना सुरक्षेबाबतच्या गंभीर धोक्यांना तोंड द्यावे लागत असून, त्यांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मुशर्रफ यांचे सहायक अख्तर शाह यांनी 13 जानेवारी रोजी न्यायालयाकडे केली आहे. 
 
Web Title: Pakistan's ex-president Musharraf dancing on ‘Dilli wali girlfriend’ with unknown girl

व्हिडीओ गॅलरी