esakal | सरकार बनण्याआधीच हाणामारी, तालिबानचा प्रमुख मुल्ला बरादर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

सरकार बनण्याआधीच हाणामारी, तालिबानचा प्रमुख मुल्ला बरादर जखमी

सरकार बनण्याआधीच हाणामारी, तालिबानचा प्रमुख मुल्ला बरादर जखमी

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: अफगाणिस्तानवर (Afganistan) तालिबानने (Taliban) वर्चस्व मिळवलं असलं, तरी सरकार स्थापनेवरुन अंतर्गत मतभेद तीव्र झाले आहेत. त्यामुळेच अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवून दोन आठवडे उलटल्यानंतरही सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार आकाराला येण्यासाठी आणखी विलंब लागू शकतो. शनिवारी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे (ISI) प्रमुख फैझ हमीद (Faiz hameed) काबुलमध्ये दाखल झाले. फैझ हमीद अचानक काबुलमध्ये आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

तालिबानच्या नव्या नेतृत्वासोबत चर्चा करण्यासाठी ते आल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात फैझ हमीद यांच्या येण्यामागे कारण दुसरेच आहे. सरकार स्थापनेवरुन तालिबानमध्ये अंतर्गत मतभेद तीव्र होत चालले आहेत. तालिबान आणि हक्कानी नेटवर्क असे सरळ, सरळ दोन गट पडले आहेत. शुक्रवारी रात्री काबुलमध्ये गोळीबाराचे आवाज ऐकू आले. हा गोळीबार पंजशीर जिंकल्याच्या आनंदात झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात या गोळीबारामागे तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल घनी बरादर आणि हक्कानी नेटवर्कमधला संघर्ष कारणीभूत आहे.

हेही वाचा: पंजशीर तालिबान जिंकणार, अहमद मसूदकडून युद्ध थांबवण्याची मागणी

या संघर्षामध्ये सरकारचे नेतृत्व करणारा मुल्ला अब्दुल घनी बरादरच जखमी झाला आहे. त्यामुळे तालिबानला सरकार स्थापन करायला आणखी विलंब लागू शकतो. फैझ हमीद आतापर्यंत निरीक्षकाच्या भूमिकेत होते. पण आता ते संकटमोचक बनून काबुलमध्ये गेले आहेत. त्यामुळे तालिबानला पुन्हा उभ करण्यामागे पाकिस्तानची भूमिका असल्याचे अधिक स्पष्ट होते. 'काळजी करु नका, सर्व काही व्यवस्थित होईल' असे फैझ हमीद काबुलमधल्या एका व्हिडीओ क्लिपमध्ये बोलताना दिसतात.

हेही वाचा: अनिल देशमुखांना अटक होणार?, ईडीची लूकआऊट नोटीस जारी

हैबतुल्ला अखुनदझादाला सर्वोच्च नेता मानण्यावरुन तालिबानमधील गट आणि हक्कानी नेटवर्कचा विरोध आहे. हक्कानी नेटवर्कचा काबुलमध्ये विशेष प्रभाव आहे. काबुलवर नियंत्रण मिळवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

loading image
go to top