esakal | Video: कब्रस्तानातून जिवंत माणूस आला बाहेर...
sakal

बोलून बातमी शोधा

tomb was dug as soon as the sound came and the shocking type came out at pakistan

कब्रस्तानातून एक जिवंत माणूस बाहेर आल्याचा प्रकार येथे घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देशामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

Video: कब्रस्तानातून जिवंत माणूस आला बाहेर...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद (पाकिस्तान): कब्रस्तानातून एक जिवंत माणूस बाहेर आल्याचा प्रकार येथे घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देशामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

चॅलेंज! दबा धरून बसलेला सिंह शोधा बरं...

कब्रस्तानातून एखादी व्यक्ती जिवंत माणूस बाहेर कसे काय येऊ शकते? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण, पाकिस्तानमध्ये ही घटना घडली आहे. घटनेमागे कारणही वेगळे आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एक व्यक्ती कबरीस्तानकडे जात होती. पावसामुळे रस्ता निसरडा झाला असल्यामुळे पाय घसरला आणि खड्ड्यात पडला. यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. खड्ड्यात पडल्यामुळे माती जमा होऊ लगाली आणि संबंधित व्यक्ती गाडली गेली. मातीमध्ये अडकल्यानंतर गुदमरून बेशुद्ध पडले. काही वेळानंतर शुद्ध आल्यावर मदतीसाठी जोर-जोरात ओरडू लागले.

कबरीमधून आवाज येत असल्यामुळे अनेकजण घाबरले. सतत आवाज येत असल्यामुळे स्थानिकांनी धाडस करून कबरीकडे धाव घेतली. शिवाय, याबाबतची माहिती पोलिसांना दिली. कबर खोदल्यानंतर एक जिवंत व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. संबंधित प्रकार पाहून स्थानिक आणि पोलिसही गोंधळले. पण, त्या व्यक्तीचा जीव वाचल्यामुळे त्याने आभारही मानले. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कराची स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्याचा Live Video...