भारताविरोधात अण्वस्त्रांचा मुशर्रफ यांचा होता विचार

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

भारतावर अण्वस्त्रांचा वापर करण्याबाबत तेव्हा सत्तेत असलेल्या मुशर्रफ यांनी गंभीरपणे विचार केला होता. मात्र, भारताकडूनही तितकीच तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी माघार घेतली

दुबई - पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी 2001 मध्ये भारताविरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्याचा गंभीरपणे विचार केला होता, असे माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दावा करण्यात आला आहे.

भारतीय संसदेवर हल्ला झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला होता. या काळात भारतावर अण्वस्त्रांचा वापर करण्याबाबत तेव्हा सत्तेत असलेल्या मुशर्रफ यांनी गंभीरपणे विचार केला होता. मात्र, भारताकडूनही तितकीच तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी माघार घेतली, असा या अहवालात दावा करण्यात आला आहे. जपानमधील एका दैनिकाने मुशर्रफ यांची मुलाखत घेऊन हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

भारताविरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्याबाबत मनात संभ्रम असताना मुशर्रफ यांना अनेक रात्री झोप आली नव्हती. त्यांनी त्या वेळी केलेल्या एका भाषणात अण्वस्त्रे वापरण्याचा इशाराही भारताला दिला होता.

Web Title: Pervez Musharraf Considered Using Nukes Against India In 2002: Report