
मॅनेजरची एक चुक अन् ग्राहकांनी लुटलं १५ रुपयांत पेट्रोल
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ सुरूच आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती ११० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. तर दुसरीकडे धक्कादायक माहितीसमोर आली आहे. एका पेट्रोल पंपावर केवळ १५ रुपयात प्रति लीटर पेट्रोल देण्यात आले. त्यामुळे तेथील नागरिकांनी संधीचा फायदा करुन घेतला पण मॅनेजरने केलेली एक चुक पेट्रोल पंपाला चांगलीच महागात पडलीय.
हेही वाचा: Jalgaon : ‘५४ रुपयांत पेट्रोल’ विक्रीचा स्टंट गेला फेल!
हे प्रकरण अमेरिकेतील नॉर्थ कॅलिफोर्निया येथील आहे. येथे रॅंचो कॉर्डोव्हा येथील शेल गॅस स्टेशनचा मॅनेजर जॉन झेसिना यांनी एक मोठी चूक केली. त्याने सांगितले की चुकून त्याने दशांश चुकीच्या ठिकाणी लावला होता. त्यामुळे तेथे पेट्रोल ५०१ रुपये प्रति लिरटरने विकले जाऊ लागले. विशेष म्हणजे अमेरिकेत अनेक पेट्रोल पंपांवर सेल्फ-सर्व्हिसची व्यवस्था आहे जिथे लोक स्वतः पेट्रोल भरतात.
याचा लाभ 200 हून अधिक लोकांनी घेतल्याचे समजते. या चुकीमुळे पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मॅनेजर जॉनने केलेली चुक कबुल केली आहे. मी स्वतः सर्वांची प्राईस लिस्ट लावली होती त्यामुळे मी माझ्या हातून झालेली चुक कबूल करतो असे स्पष्टीकरण त्याने यावेळी दिले. तसेच, तोटा भरून काढण्यासाठी गॅस स्टेशनचा मालक त्याच्यावर गुन्हा दाखल करणार नाही याची काळजी वाटत असल्याचेही जॉनने म्हटले आहे.
यसोबतच कुटुंबाने GoFundMe तयार केला आहे. जेणेकरून तो निधी गोळा करून तोटा भरून काढू शकेल. अशी माहितीदेखील त्याने यावेळी दिली आहे.
हेही वाचा: चहा कमी प्या,अर्थव्यवस्था वाचवा; पाकिस्तानचं नागरिकांना आवाहन
जॉनमुळे पेट्रोल पंपाला चांगलेच नुकसान झाले आहे. मोठ्या संख्येने ग्राहकांनी कमी किमतीती टाकी फुल करुन घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाला १२.५ लाखाचे नुकसान झालं आहे.
Web Title: Petrol Selling Rs 15 Per Liter At America North California Petrol Pump Hundreds Of People Arrived
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..