Pfizer, AstraZeneca लस डेल्टा व्हेरियंटवर कमी प्रभावी; नवा निष्कर्ष

या दोन्ही लस परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
Pfizer Corona vaccine
Pfizer Corona vaccinefile photo

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड विद्यापीठात झालेल्या एका नव्या अभ्यासानुसार, Pfizer, AstraZenecaची लस डेल्टा व्हेरियंटवर कमी प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या दोन कंपन्यांच्या लस परदेशात जास्तीत जास्त वापरल्या जात आहेत.

Pfizer Corona vaccine
राष्ट्रपती कोविंद यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया; रुग्णालयातून डिस्चार्ज

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, Pfizer किंवा AstraZeneca लस पहिल्या डोसनंतर ९० दिवसांनी अनुक्रमे ७५ आणि ६१ टक्के कार्यक्षम आहेत. तर या लसींच्या दुसऱ्या डोसनंतर दोन आठवड्यात अनुक्रमे ८५ टक्के आणि ६८ टक्के प्रभाव कमी होतो.

Pfizer Corona vaccine
ED बद्दलची याचिका SC ने स्वीकारली - अनिल देशमुख

ब्रिटिश पब्लिक हेल्थ स्टडीनं यावर भर दिलाय की, या दोन लसींमुळे डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्याचबरोबर अभ्यासातून हे ही समोर आलंय की, ज्या व्यक्तींचं पूर्ण लसीकरण झालंय त्यांच्यामधील व्हायरल लोड हा इन्फेक्शन झालेलं असतानाही घेतलेल्या लसीप्रमाणं असतो.

Pfizer Corona vaccine
"ही जन आशीर्वाद यात्रा नसून..."; महापौरांचे राणेंना प्रत्युत्तर

तर अभ्यासकांनी असंही सुचवलंय की, Pfizer-BioNTech vaccine आणि Oxford-AstraZeneca लस अद्यापही डेल्टा व्हेरियंटविरोधात चांगलं संरक्षण देऊ शकतात. या दोन्ही लसींचे दोन डोस नैसर्गिक संसर्गानंतर अद्यापही समान पातळीवरील संरक्षण पुरवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com