'लस निवडा, नाहीतर तुरुंगात टाकेन', फिलिपाइन्समध्ये धमकी

'मला चुकीचं समजू नका'
rodrigo duterte
rodrigo duterte
Updated on

मनिला: सध्याच्या घडीला कोरोनाला (corona virus) रोखण्याचा लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांनी लसीकरणावर भर दिला आहे. लसीकरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरु आहे. पण तरीही काहीजण लसीकरण (vaccination) करुन घ्यायला तयार नाहीयत. खरंतर लसीकरण हेच कोरोनाविरोधात प्रभावी औषध (medicine) आहे. अनेक देश लसीकरणाबद्दल जनजागृती करतायत पण त्यांनी सक्ती केलेली नाही. (Philippines president Rodrigo Duterte warn You choose Covid vaccine or I will have you jailed)

फिलिपाइन्स मात्र आपल्या नागरिकांवर लसीकरणासाठी सक्ती करु शकतो. फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी तसा इशाराच दिला आहे. लसीकरणाला नकार देणाऱ्या नागरीकांना मी तुरुंगात टाकीन, अशी धमकीच रॉड्रिगो दुतेर्ते यांनी दिली आहे. 'तुम्ही काय ते निवडा, लस किंवा लस नको असेल, तर मी तुम्हा जेलमध्ये टाकीन' असा इशारा रॉड्रिगो दुतेर्ते यांनी सोमवारी दिला.

rodrigo duterte
मुख्यमंत्री ठाकरे आणि भाजपा नेत्यांमध्ये दिसली अनोखी 'दोस्ती'

'तुमचे लसीकरण झालेले नसेल, तर तुम्ही कोरोनाचे वाहक असू शकता' असे रॉड्रिगो म्हणाले. फिलिपाइन्समध्ये १३ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असून २३ हजार मृत्यू झाले आहेत. फिलिपाइन्सची राजधानी मनिलामध्ये लसीकरणासाठी कमी संख्येने लोक येत असल्याची बातमी आहे.

rodrigo duterte
राऊत अडचणीत?, महिलेच्या अटकेप्रकरणी HC चे पोलीस आयुक्तांना निर्देश

रॉड्रिगो दुतेर्ते यांचे विधान हे त्यांच्याच आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात जाणारे आहे. लोकांना लसीकरण बंधनकारक नाही असे फिलिपाइन्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले होते. 'मला चुकीचं समजू नका, देशात संकट आहे' असं ड्युटर्ट म्हणाले. लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी सुद्धा क्वारंटाइन बंधनकारक असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com