Video: किंचाळण्याचा आवाज ऐकला अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 14 July 2020

एका घराला आग लागली आणि माय-लेकांच्या किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. घराच्या गॅलरीत येऊन मातेने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला बाहेर फेकले आणि एका फुटबॉलपटूने अलगद झेलून त्याचे प्राण वाचवले.

मिशीगन (अमेरिका): एका घराला आग लागली आणि माय-लेकांच्या किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. घराच्या गॅलरीत येऊन मातेने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला बाहेर फेकले आणि एका फुटबॉलपटूने अलगद झेलून त्याचे प्राण वाचवले. फिलिप ब्लँक्स असे फुटबॉलपटूचे नाव आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: कब्रस्तानातून जिवंत माणूस आला बाहेर...

मिशीगॅन येथील कालामाझू सेंट्रल हायस्कूलचा माजी फुटबॉलपटू आणि यूएस मरिनचा निवृत्त अधिकारी असलेला फिलीप आपल्या मित्राच्या घरी गेला होता. फोएनिक्स येथील मित्राच्या घरा शेजारील अपार्टमेंटला 10 जुलै रोजी आग लागली.  आगीत अडकलेल्या माय-लेकाच्या किंचाळण्याचा आवाज फिलिपनं ऐकला आणि तो ताडतीने तिकडे धावत गेला. आगीत अडकलेल्या आईने तिच्या 3 वर्षांच्या मुलाला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. फिलिपने धावत येऊन मुलाला झेलून त्याचा जीव वाचवला. परंतु त्या आईचा आगीत होरपळून मृत्यू झाला. संबंधित घटना एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केली होती. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर फिलिपच्या शौर्याचे कौतुक होत आहे. फिलिप म्हणाला, ''मुलाचे आयुष्य वाचवल्यानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आपल्या आयुष्याची किंमत मला कळली. एकमेकांशी तंटा करून आयुष्य घालवण्यापेक्षा एकमेकांची काळजी घ्यायला हवी.''

Video: विमानात अचानक पाणी लागले गळू...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: phillip blanks saves child from burning apartment video viral