गुगल भारतात करणार १० अब्ज डॉलर्स गुंतवणूक; सुंदर पिचाईंनी केली घोषणा

वृत्तसंस्था
सोमवार, 13 जुलै 2020

गुगल भारतात १० अब्ज डोलर्स कोटींची गुंतवणूक करणार आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी ही घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : गुगल भारतात १० अब्ज डोलर्स कोटींची गुंतवणूक करणार आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी ही घोषणा केली आहे. १० अब्ज डॉलर म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे ही गुंतवणूक ७५ हजार कोटी रुपये आहे. गुगल फॉर इंडिया (Google For India) अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक कर

वेगवेगळ्या संस्थांमधली भागिदारी, इक्विटी पायाभूत सुविधा आणि डिजिटायझेशनसाठीच्या इतर सोयींसाठी ही रक्कम फक्त भारतात खर्च होईल. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केलं आहे. पिचई यांनी आज (ता. १३) सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर पिचई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही यासंदर्भातील माहिती दिली आहे.
-----------------
राजस्थानात सत्ताबदल झाल्यास मायावतींना होणार सर्वाधिक आनंद 
------------------
काँग्रेसची मध्यरात्री अडीच वाजता पत्रकार परिषद; केला 'हा' मोठा दावा
------------------

आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार, असं ट्विट पिचई यांनी केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pichai Announces Rs 75k cr Startup Fund Teach From Home Hub and More