विमान कोसळून  नऊ जण ठार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

साठ वर्षे सरकारी सेवा बजावणारे एअर नॅशनल गार्डचे सी-130 विमान आज शेवटच्या हवाई सफरीवर असताना जॉर्जियात सवानाह विमानतळाजवळ अपघातग्रस्त झाले. या अपघातात विमानातील सर्वच्या सर्व नऊ कर्मचारी ठार झाले.

पोर्ट वेंटवर्थ (अमेरिका)-  साठ वर्षे सरकारी सेवा बजावणारे एअर नॅशनल गार्डचे सी-130 विमान आज शेवटच्या हवाई सफरीवर असताना जॉर्जियात सवानाह विमानतळाजवळ अपघातग्रस्त झाले. या अपघातात विमानातील सर्वच्या सर्व नऊ कर्मचारी ठार झाले.

विमानाच्या अपघातामागे नेमके कारण आताच सांगता येणार नाही, असे जॉर्जियाच्या नॅशनल गार्डचे प्रवक्ते डेन्सिरी बांबा यांनी सांगितले. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळाहून धुराचे लोट दिसू लागले. अमेरिकी हवाईदलाच्या मते, ही घटना स्थानिक वेळेनुसार साडेअकरा वाजता घडली. सर्व मृत हे 198 फायटर स्क्वाड्रोनचा भाग होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plane collapsed Nine people are dead