
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा पाकिस्तान हरीक-ए-इन्साफ (PTI) चे वरिष्ठ नेते फैसल वावडा यांनी केला. इम्रान खान यांची हत्या करण्याचा कट रचला गेला असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या एआरवाय न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. (PTI senior leader Faisal Vawda has claimed that Prime Minister Imran Khan’s life is in danger as a plot has been hatched to assassinate him )
सध्या पाकिस्तानचे राजकारण चर्चेचा विषय ठरलाय. पाकिस्तानमध्ये राजकीय परिस्थिती हलाखीची असून लवकरच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा सत्तेवरुन पायउतार होण्याची दाट शक्याता आहे. यातच इम्रान खान यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केल्याने पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांना बुलेट प्रूफ शील्ड सल्ला देण्यात आला. सोबतच सार्वजनिक कार्यक्रमात संबोधित करताना त्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. खान यांची हत्या करण्याचा कट रचला गेला असल्याचे वक्तव्य करणारे फैसल हे इम्रान खान यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहले जात आहे.
सध्या इम्रान खान राजकीय संकटाचा सामना करत आहे. त्यांचे पंतप्रधान पद धोक्यात आहे. या आधी इम्रान खान आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.