तालिबानप्रकरणी भारत संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेचे समर्थन करतो - PM मोदी

तालिबानप्रकरणी भारत संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेचे समर्थन करतो - PM मोदी

नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या वार्षिक शिखर परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना मोदींनी आज अफगाणिस्तानातील तालिबानच्या उदयावर आणि दहशतवादावर भाष्य केलं आहे. त्यांनी या परिषदेत भारताची अफगाणिस्तानविषयक भुमिका तर विषद केली आहेच. त्याचबरोबर त्यांनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांबाबत देखील सविस्तर चर्चात्मक मांडणी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, अफगाणिस्तानातील अलीकडील घडामोडींमुळे अवैध शस्त्रे, ड्रग्ज आणि मानवी तस्करीची शक्यता वाढू शकते.

तालिबानप्रकरणी भारत संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेचे समर्थन करतो - PM मोदी
मोदींच्या वाढदिनी लसीकरणाचा विक्रम! भारतात दिवसभरात दिले जाणार दोन कोटी डोस

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्यासारख्या शेजारी राष्ट्रांना अफगाणिस्तानमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे मुख्यतः प्रभावित केले आहे. तर, या संदर्भात प्रादेशिक लक्ष आणि प्रादेशिक सहकार्य खूप महत्वाचे आहेत. म्हणूनच हे आवश्यक आहे की जागतिक समुदायाने नवीन प्रणालीच्या मान्यतावर, एकत्रितपणे आणि योग्य विचारविनिमयाने निर्णय घ्यावा. या प्रकरणावर भारत संयुक्त राष्ट्रांच्या मध्यवर्ती भूमिकेचे समर्थन करतो, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले की, आपल्याला चार मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. पहिला मुद्दा, अफगाणिस्तानमधील सत्ता बदल हा काही सर्वसमावेशक नाही. हे कसल्याीह प्रकारच्या वाटाघाटीशिवाय घडलं आहे. यामुळे नवीन यंत्रणेच्या स्वीकृतीवर अनेक प्रश्न निर्माण होतात. तिथे आता महिला, अल्पसंख्यांक आणि अफगाण समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे.

तालिबानप्रकरणी भारत संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेचे समर्थन करतो - PM मोदी
'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' का होतोय साजरा; राहुल गांधींनी दिलं उत्तर

हे निकष येत्या काळात जागतिक दहशतवादविरोधी सहकार्यासाठी पायंडा बनू शकतात. मात्र, हे निकष दहशतवादाविरूद्ध शून्य सहनशीलतेच्या तत्त्वावर आधारित असले पाहिजेत. सीमापार दहशतवाद आणि दहशतवादी वित्तपुरवठ्यासारख्या कार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आचारसंहिता असावी, अशी देखील अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे.

मोदींनी म्हटलंय की, सर्व देश दहशतवादाला बळी पडले आहेत, म्हणून आपण सर्वांनी मिळून हे ठरवलं पाहिजे की अफगाणिस्तानची भूमी ही कोणत्याही देशात दहशतवाद पसरवण्यासाठी वापरली जाणार नाही. यासाठी एससीओ सदस्य राष्ट्रांनी या विषयावर कठोर नियम विकसित केले पाहिजेत. जर अफगाणिस्तानात अस्थिरता आणि कट्टरतावाद सुरू राहिला तर जगभरात दहशतवादी आणि अतिरेकी विचारसरणीला प्रोत्साहन मिळेल. इतर अतिरेकी संघटनांना हिंसेद्वारे सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com