माँ काली जगाला कोरोनामुक्त कर; पंतप्रधान मोदींची प्रार्थना

pm modi india bangladesh
pm modi india bangladesh

ढाका - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून मोदी गोपालगंज जिल्ह्यातील तुंगीपारा इथं पोहोचले आहेत. याठिकाणी बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी व्हिजीटरबूकमध्ये संदेश लिहिला आणि वृक्षारोपणही केलं. मोदींच्या या दौऱ्यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनासुद्धा उपस्थित होत्या. पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान याठिकाणी गेले आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. 

पंतप्रधान मोदी शनिवारी सतखिरा इथल्या जेशोरेश्वरी काली मंदिरात दर्शनासाठी गेले होते. याठिकाणी त्यांनी पूजा केली. 51 शक्तीपीठांपैकी एक मंदिर मानलं जातं. मंदिरात पूजा अर्चा केल्यानंतर मोदी म्हणाले की, माँ कालीने जगाला कोरोनाच्या संकटातून मुक्त करावं अशी प्रार्थना केली. यावेळी मोदींनी देवीला मुकुट अर्पण केला. चांदीपासून तयार करण्यात आलेल्या या मुकुटावर सोन्याचं प्लेटिंग करण्यात आलं आहे. इथल्या पारंपारिक कलाकारांनी तीन आठवड्यात हा मुकुट घडवला आहे. 

मोदींनी यावेळी कम्युनिटी हॉल बांधण्याची घोषणा केली. माझा प्रयत्न आहे की संधी मिलाली तर या 51 शक्तीपीठांमध्ये जाऊन दर्शन घेईन. नवरात्रीमध्ये जेव्हा देवीची यात्रा भरते तेव्हा सीमेपलिकडून मोठ्या संख्येनं भक्त याठिकाणी येतात असं मी ऐकलं आहे. याठिकाणी कम्युनिटी हॉलची गरज आहे. भक्तांसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना राहण्यासाठी उपयोगी पडेल असा कम्युनिटी हॉल उभारण्याचं आश्वासनही मोदींनी दिलं. 

बांगलादेश दौऱ्यात मोदी आणखी काही मंदिरांना भेट देणार आहेत यामध्ये ओराकांडीतील मतुआ समाजाचं मंदिरही आहे. ओराकांडी इतं मतुआ समाजाचे संस्थापक हरिश्चंद्र ठाकूर यांचा जन्म झाला होता. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत या समाजाची भूमिका महत्त्वाची ठरते. 

गेल्या वर्षी कोरोनामुळे मोदींचा बांगलादेश दौरा रद्द करण्यात आला होता. नियोजित दौरा मार्च 2020 मध्ये होता. शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते जाणार होते. मात्र कोरोनामुळे त्यांनी दौरा रद्द केला होता. आता जवळपास 15 ते 16 महिन्यांनी ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com