QUAD परिषद : ऑस्ट्रेलियाच्या नव्या PM ला भेटणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांमध्ये मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Meet Australia New PM

QUAD परिषद : ऑस्ट्रेलियाच्या नव्या PM ला भेटणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांमध्ये मोदी

टोकियो येथे मंगळवारी QUAD ची परिषद (QUAD Summit) होणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Australia New PM Anthony Albanese) यांची भेट घेणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) समावेश असेल. कारण, अल्बानीज यांनी स्वतः पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे सांगितले. याबाबत एएफपीने उत्तर दिले आहे.

हेही वाचा: ‘भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करारातून विद्यार्थ्यांना वर्क व्हिसा, १० लाख रोजगार मिळणार’

ऑस्ट्रेलियातील सार्वत्रिक निवडणुकीत अल्बानीज यांच्या लेबर पार्टीने कंझर्व्हेटीव्ह पक्षाचा पराभव केला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी अल्बानीज यांचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियन लेबर पार्टीच्या विजयाबद्दल नवीन पंतप्रधानांचे अभिनंदन. आपल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील संबंध टिकविण्यासाठी आपण काम करुयात, असं मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे.

निवडणुकीतील विजयानंतर अल्बानीज यांनी देखील माध्यमांसोबत संवाध साधला. भारताचे पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी अल्बानीज भेट घेणार आहेत. हवामान बदलाबाबत धोरणात काही बदल केले जातील. ऑस्ट्रेलियाचे जगासोबत संबंध या विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे, असं अल्बानीज यांनी सांगितलं.

शिखर परिषदेत कोविड नंतरची परिस्थिती, आरोग्य सुरक्षा, हवामान कृती, टिकाऊ पायाभूत सुविधा प्रकल्प आणि लवचिक पुरवठा साखळी तयार करणे यासह अनेक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे, असं परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितलं होतं. दरम्यान,ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या कार्यकाळात भारत आणि ऑस्ट्रेलियाने दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली. भारत आणि ऑस्ट्रेलियाने 2 एप्रिल रोजी व्यापार करारावर स्वाक्षरी केली.

Web Title: Pm Modi Will Be First Global Leaders To Meet Australia New Prime Minister During Quad Summit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modiaustralia
go to top