Modi Video : 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' इजिप्तच्या महिलेचं गाणं ऐकून पंतप्रधान मोदी मंत्रमुग्ध

Modi in Egypt
Modi in Egyptesakal

Modi in Egypt : अमेरिकेचा दौरा अटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचं तिथंही जंगी स्वागत झालं. एका इजिप्तशियन महिलेने त्यांच्या स्वागतार्थ गायलेल्या गाण्याने मोदी मंत्रमुग्ध झाल्याचं पहायला मिळालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा तीन दिवसीय दौरा आटोपून इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. इजिप्तची राजधानी कैरो इथल्या विमानतळावर त्यांचं आगमन झालं. तिथं त्यांचं लष्करानं बँड वाजवून जोरदार स्वागत केलं.

कैरोमध्ये शोले या चित्रपटातील 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' या गाण्याने जेना नावाच्या इजिप्तशियन महिलेने त्यांचं स्वागत केलं. हे गाणं ऐकूण पंतप्रधान मंत्रमुग्ध झाले. त्यांनी टाळ्या वाजवून या महिलेचं कौतुक केलं. "पीएम मोदींना भेटून खूप छान वाटले" असं जेना म्हणाली. याशिवाय तिने माध्यमांना 'लग जा गले' हे गाणं ऐकवलं.

उद्या PM मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह आई सीसी यांची भेट घेणार आहेत. हेलिओपोलिस युद्ध स्मारक आणि अल हकीम मशीद इथं भेटीदरम्यान या दोन नेत्यांमध्ये अधिकृत चर्चा होणार आहे. तसेच कैरो इथं मोदींचं आगमन झाल्यानं तिथले अनिवासी भारतीय मोदींच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.

PM मोदींचा इजिप्तमधील हा पहिलाच अधिकृत राजकीय दौरा असून या ठिकाणी दोन दिवस विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राजधानी कैरो इथं पंतप्रधानांचं विमान लँड झाल्यानंतर इजिप्तचे पंतप्रधान मोस्ताफा मॅडबॉली यांनी त्यांचं स्वागत केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com