
"मै मख्खन पर नहीं पत्थर पर लकीर करता हूॅं"; मोदींनी टोकियोत मांडली भूमिका
टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौऱ्यावर असून इथल्या क्वाड परिषदेत सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी जपानमधील भारतीयांनी बोलावलेल्या स्वागत समारंभात पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भारतात आपण किती ठाम निर्णय घेत आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मला लोण्यावर नाही दगडावर रेष ओढायला आवडतं अशा शब्दांत मोदींनी टोकियोत आपली भूमिका मांडली. (PM Narendra Modi interacting with the Indian diaspora in Tokyo)
मोदी म्हणाले, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा सर्वकाही बंद होतं त्या संकटाच्या काळातही भारत सरकार केवळ एक बटन दाबून करोडो भारतीयांपर्यंत मदत पोहोचवत होता. ज्यांसाठी ही मदत निश्चित करण्य्यात आली होती त्यांनाच ती वेळेत मिळाली आणि या संकटातून मार्ग काढण्याचं सामर्थ्यही त्यांना मिळालं.
हेही वाचा: मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र लढणार की आघाडीसह? काँग्रेस नेत्यानं सांगितला प्लॅन
भारतात आज खऱ्या अर्थानं जनतेचं सरकार काम करत आहे. सकारचं हेच मॉडेल लोकशाहीवर विश्वास दृढ होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. भारत आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. यानंतर पुढील २५ वर्षे स्वांतत्र्याच्या शंभराव्या वर्षात भारताला आपल्याला जगात कुठे कुठे पोहोचवायचं आहे. त्या मार्गावर आज भारत चालू लागला आहे.
हेही वाचा: ...तर भाजपच्या जलआक्रोश मोर्चात मी सहभागी होईल - इम्तियाज जलील
स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव भारताच्या संपन्नतेचा बुलंद इतिहास लिहिणार आहे. हा जो संकल्प आपण केला आहे, तो खूप मोठा आहे. पण मित्रांनो माझं जे पालन पोषण झालंय. माझ्यावर जे संस्कार झालेत ज्यांनी मला घडवलं आहे. त्यामुळं मलाही एक सवय लागलीए (मुझे पत्थर पर लकीर खिंचने पसंद नही मै पत्थर पर लकीर खिंचता हूं) मला लोण्यावर रेष ओढायला आवडत नाही मी दगडावर रेष ओढतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण किती ठामपणे काम करत आहोत, याची ग्वाही दिली.
Web Title: Pm Narendra Modi Interacting With The Indian Diaspora In Tokyo
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..