...तर भाजपच्या जलआक्रोश मोर्चात मी सहभागी होईल - इम्तियाज जलील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imtiyaz Jaleel
...तर भाजपच्या जलआक्रोश मोर्चात मी सहभागी होईल - इम्तियाज जलील

...तर भाजपच्या जलआक्रोश मोर्चात मी सहभागी होईल - इम्तियाज जलील

औरंगाबाद : पाण्याच्या मुद्द्यावरुन भाजपनं औरंगाबाद शहरात आयोजित केलेला मोर्चा हा केवळ भाजपचा शक्तीप्रदर्शनाचा भाग आहे. यामुळं औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न मिटणार नाही. जर फडणवीसांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही इतक्या महिन्यात पाणी प्रश्न सोडवू तर मीच काय संपूर्ण औरंगाबाद शहर भाजपच्या या मोर्चामध्ये सहभागी होईल, असं आव्हान औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भाजपला दिलं आहे. (then I will participate in BJP Jal akrosh Morcha says Imtiaz Jalil)

हेही वाचा: 'अपक्षांना पाठिंबा नाहीच; संजय राऊतांचा संभाजीराजेंना थेट इशारा

माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले, "भाजपनं औरंगाबाद शहरात पाण्यासाठी काढलेला मोर्चा म्हणजे केवळ शक्तीप्रदर्शन आहे. कारण फडणवीस आणि भाजपला हे चांगलं माहिती आहे की कितीही मोठा मोर्चा काढला तरी आजच्या परिस्थितीत येत्या दोन वर्षात औरंगाबाद शहराला पाणी मिळणार नाही. मग आपण मोर्चा कशासाठी काढता आहात? त्यांना पाण्याशी काहीही देणघेणं नाही, त्यांना फक्त शिवसेनेला दाखवायचंय की आमची इथं ताकद आहे"

हेही वाचा: बिहारमध्ये राजकीय खळबळ; ७२ तास आमदार-खासदारांना पटना सोडण्यास बंदी

ज्या प्रकारे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेना लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा करत आहे त्याप्रमाणं आम्हीही तुमच्यापेक्षा कमी नाही आहोत कारण आम्ही देखील गेल्या तीन वर्षांपासून सत्तेत होतो. त्यामुळं फडणवीसांना माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनी आजच्या सभेत याचं उत्तर द्या, कारण भाजप-शिवसेनेकडून औरंगाबादमध्ये समांतर कंपनी लादण्यात आली होती. ही कंपनी कोणाची होती? ही कंपनी भाजपच्या खासदाराची कंपनी होती. ती आमच्यावर लादण्यासाठी तुम्ही किती दबाव टाकला होता? तुमचा यामागे एकच उद्देश होता की, औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न एका खासगी कंपनीच्या हाती द्यायचा. आज आपण महाराष्ट्र जीवन प्राधाकरणाकडून जे काम करवून घेत आहात तेच काम सन २०१४ मध्ये आपण केलं असतं तर आज औरगाबादची इतकी भयंकर परिस्थिती राहिली नसती. पण यामध्ये भाजप-शिवसेनेला आर्थिक रस होता, त्यामुळं ही परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, आता तुम्ही कितीही भव्य मोर्चा काढा त्याचा काहीही फरक पडणार नाही, असंही यावेळी जलील म्हणाले.

हेही वाचा: कोकण, विदर्भात पुढच्या 3 दिवसांत पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

आज जे काम सुरु आहे यावरुन मी तुम्हाला चॅलेंज देतो की येत्या दोन वर्षात हे काम होणार नाही. मग मोर्चातून साध्य काय होणार? जर तुमच्या मोर्चामुळं आम्हाला दोन-तीन महिन्यात पाणी मिळणार असेल तर तुमच्या मोर्चात मीच काय संपूर्ण औरंगाबाद शहर सामील होईल. पण त्यासाठी तुम्ही आम्हाला लिहून द्या की इतक्या महिन्यात आम्ही पाणी आणू. तुम्हाला शक्तीप्रदर्शन करायचं आहे तर करा पण पाण्यावरुन राजकारण करु नका, अशी विनंतीही यावेळी खासदार जलील यांनी केली.

Web Title: Then I Will Participate In Bjp Jal Akrosh Morcha Says Imtiaz Jalil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top