मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र लढणार की आघाडीसह? काँग्रेस नेत्यानं सांगितला प्लॅन

मुंबई महापालिकेसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
bmc election
bmc election sakal

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्यानं मित्रपक्षांवर आगपाखड करणारा काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वतंत्र लढणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण काँग्रेसची भूमिका नक्की काय असेल याचा प्लॅन काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितला आहे. (Will you fight for BMC Election independently or with MVA Congress leader H K Patil told plan)

bmc election
...तर भाजपच्या जलआक्रोश मोर्चात मी सहभागी होईल - इम्तियाज जलील

महाविकास आघाडीत असल्यानं राज्यातील इतर स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद कमी होऊ लागली आहे का? या पत्रकार परिषदेतील प्रश्नावर पाटील म्हणाले, "काही जणांमुळं काँग्रेसचा सर्वसामान्यांशी असलेला संपर्क तुटू लागल्याचं आपल्याला वाटतं. पण तसं नाही आमचा तळागळातील जनतेपर्यंत अद्यापही संपर्क कायम आहे, काँग्रेस पक्ष स्वतः तेवढा सक्षम आहे. पण मुंबई महापालिकेसाठी आघाडी करायची की नाही हे आम्ही १ आणि २ जून रोजी होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनात ठरवणार आहोत.

bmc election
राज्य सरकारकडून व्हॅट कमीची घोषणा; GR ची मात्र प्रतीक्षाच

काँग्रेसचं राजस्थानातील उदयपूर इथं नुकतंच राष्ट्रीय चिंतन शिबिर पार पडलं यावेळी पक्षातील विविध मु्द्द्यांवर मंथन झालं. यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचं येत्या १ आणि २ जून रोजी अधिवेशन होणार आहे. यावेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांसह महाविकास आघाडीतील भुमिकेबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com