'पीओके'मधील नेत्यांकडून मोदींचे कौतुक, कारण...

वृत्तसंस्था
Sunday, 22 March 2020

जगभरात वेगाने फैलाव होत असलेल्या कोरोना विषाणूचा भारतातील संसर्ग रोखण्यासाठी आज देशभरात जनता कर्फ्युचे घोषणा केली. मोदींच्या या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे.

ग्लासगो : कोरोना विषाणूविरोधात लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) उचललेल्या जनता कर्फ्यूचे स्वागत पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके), गिलगिट बाल्टिस्तानमधील नेत्यांनी कौतुक केले आहे. 

जगभरात वेगाने फैलाव होत असलेल्या कोरोना विषाणूचा भारतातील संसर्ग रोखण्यासाठी आज देशभरात जनता कर्फ्युचे घोषणा केली. मोदींच्या या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. पूर्ण रस्ते मोकळे होते. मोदींच्या या निर्णयाचे कौतुक होत असताना आता पीओकेमधील नेत्यांनीही याचे कौतुक केले आहे.

सध्या ग्लासगोमध्ये असलेले पीओकेमधील नेते अमजद अयुब मिर्झा म्हणाले, की कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेला जनता कर्फ्युचा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे. यातून मोदींचे नेतृत्वगुण दिसत आहेत. नेतृत्वगुणाच्या अभावामुळे पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली आहे. पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्त नागरिकांना पीओकेमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. यामुळे या भागात व्हायरस पसरणार आहे. चीन आणि गिलगिट बाल्टिस्तान सीमा बंद करण्याची गरज आहे. गिलगीटमध्ये रुग्णालयांची कमतरता असून, एका ड़ॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PoK Gilgit leaders praise PM Modi's steps against Coronavirus