PoK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तरंजित संघर्ष! निदर्शकांवर गोळीबार, १२० जण ठार झाल्याचा दावा; तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

Rawalakot Firing : पंजाब रेंजर्सवर पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप; नागरिकांवर गोळीबार थांबवण्याचा प्रयत्न होता. जुलैतील निवडणुकांपूर्वी राजकीय प्रतिनिधित्व आणि मूलभूत सुविधांसाठी आंदोलन तीव्र झाले आहे.
Protesters gather in Rawalakot, PoK

Protesters gather in Rawalakot, PoK

esakal

Updated on

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) मधील परिस्थिती सतत तणावपूर्ण आहे. सोमवारी रावळकोटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ११० हून अधिक नागरिक मरण पावल्याचा दावा केला जात आहे. सुमारे ३०० लोक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 'जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी'ने आज देखील निदर्शने करण्याचे आवाहन केले होते. कोटलीमध्ये निदर्शकांवर झालेल्या लाठीचार्जमध्ये ११ नागरिक मरण पावल्याचेही वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com