अबब! युरोपात पोलिसांनी नष्ट केला 166 एकरातला गांजा; तिघे अटकेत

नष्ट केलेली गांजीची शेती सर्वप्रथम औद्योगिक कारणांसाठी केली जात असल्याचे भासवण्यात आले होते.
Hemp
HempSakal

अवैध्यरित्या गांज्याची शेती करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई किंवा पोलिसांची गांज्याची (Cannabis) शेती केली नष्ट अशा बातम्य वाचल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र, युरोपमध्ये बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केल्याप्रकरणी 166 एकर जागेतील सुमारे 100 दशलक्ष युरो किमतीचा गांजा नष्ट केला आहे. तसेच या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. एवढेच नव्हे तर, कॅनबिडिओलसाठी (सीबीडी) सुमारे 50 टन गांजा एका गोदामात वाळवला जात होता, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Police Destroy Farm Of Cannabis )

Hemp
बाबासाहेबांचा आर्टिकल ३७०ला विरोध होता पण...; फडणवीसांचे पवारांवर टीकास्त्र

नष्ट करण्यात आलेली गांजीची शेती सर्वप्रथम औद्योगिक (Cannabis Farming For Industry) कारणांसाठी केली जात असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, तपासाअंती या सर्वामध्ये विरोधाभास आढळून आला. लावण्यात आलेला हा गांजा सीबीडीमध्ये प्रक्रिया करण्यासाठी इटली आणि स्वित्झर्लंडला निर्यात करण्याचे नियोजन होते असेदेखील पोलीस तपासात समोर आले असून, 2021 मध्ये गांज्याची ही शेती लावण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

युरोपच्या अनेक भागात सीबीडी विक्री आणि वापर करणे कायदेशीर आहे. मात्र औद्योगिक कारणाशिवाय गांजाची लागवड करण्यास मनाई आहे. असे असताना देखील तेथे अवैध्यरित्या गांजाची लागवड केली जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com