
व्हॅटिकन सिटी (पीटीआय) : कॅथोलिक ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च नेते २६६वे पोप फ्रान्सिस (वय ८८) यांचे आज दीर्घ आजारानंतर व्हॅटिकन सिटी येथे निधन झाले. ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील ते लॅटिन अमेरिकेतील पहिले पोप होते. गरीब आणि युद्धग्रस्त देशांमधील पीडित लोकांबद्दल वारंवार काळजी व्यक्त करत त्यांना जगाला प्रेमाचा आणि माणुसकीचा संदेश दिला होता. याशिवाय, भांडवलवाद आणि पर्यावरण या मुद्द्यांवर परंपरावाद्यांच्या मतांशी फारकत घेतली होती. पोप यांच्या निधनाबद्दल जगभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे.