'या' विषाणूमुळे भारताला सर्वांत जास्त धोका

The possibility of Corona outbreak in India
The possibility of Corona outbreak in India

वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेची गुप्तचर संस्था कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून आहे. तसेच चीनसह जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना या विषाणूमुळे भारताला सर्वांत जास्त धोका असण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी वर्तवली. 

भारतातील प्रचंड लोकसंख्येमुळे कोरोनाचा प्रसार भारतात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता या संस्थेने वर्तवली असून, जर हा रोग भारतात पसरला, तर येथील आरोग्य अधिकारी या रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी सक्षम आहेत का, हा सवालदेखील या गुप्तचर संस्थेने विचारला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेकडून जरी चिंता व्यक्त केली जात असली, तरी चीनसारखीच प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये आजवर कोरोनाची लागण झालेली तीनच प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ही सर्व प्रकरणे केरळ राज्यात आहेत. सरकारच्या निवेदनानुसार, आणखी २३ हजार ५३१ जण सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.असे असले तरी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी भारताच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्याचे थांबवले नाही.

जगभरात फैलाव
चीनमध्ये दोन हजार ७८८ जणांचा मृत्यू
इराणमध्ये १९ जणांचा मृत्यू; १४० जणांना लागण
इराणच्या उपराष्ट्रपती मासूमेह इब्तिकार यांच्यावर उपचार सुरू
दक्षिण कोरियात दोन हजार जणांना लागण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com