सिंगापूरमध्ये सिनेमागृहे लवकरच सुरू होण्याची शक्यता

पीटीआय
मंगळवार, 7 जुलै 2020

येत्या १३ जुलैपासून सिंगापूरमध्ये प्रेक्षकांसाठी टॉकीजची कवाडे उघडण्याची शक्यता आहे. इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट ॲथोरिटीने दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमधील साखळी चित्रपटगृहे १३ पासून तर स्वंतत्र चित्रपटगृहे १५ पासून सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. श्रोत्यांना ठराविक अंतर ठेऊनच सिनेमा पाहता येणार आहे. सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमांचा भंग होणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाणार आहे.

सिंगापूर - कोविड-१९ च्या उद्रेकामुळे बंद असलले सिंगापूरमध्ये सिनेमागृहे लवकरच सुरू होणार आहे. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत प्रेक्षकांना सिनेमा पाहवा लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येत्या १३ जुलैपासून सिंगापूरमध्ये प्रेक्षकांसाठी टॉकीजची कवाडे उघडण्याची शक्यता आहे. इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट ॲथोरिटीने दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमधील साखळी चित्रपटगृहे १३ पासून तर स्वंतत्र चित्रपटगृहे १५ पासून सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. श्रोत्यांना ठराविक अंतर ठेऊनच सिनेमा पाहता येणार आहे. सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमांचा भंग होणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाणार आहे.

चीनमुळे जगाचं खूप मोठं नुकसान; ट्रम्प यांचा पुन्हा हल्लाबोल

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आणि लॉकडाउन असल्याने सिंगापूरमधील टॉकीज गेल्या २६ मार्चपासून बंद आहेत. सरकारकडून मर्यादित प्रेक्षकांच्या अटींवर सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉलिवूडपटांकडे चित्रपयगृहांचा कल राहिलेला आहे. मात्र यावेळी नव्याने टॉकीज सुरू होताना कोरियाचा ट्रेन टू बुसान चा सिक्वेल पेनिनसुला चित्रपटांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे.  सिंगापूरची लोकसंख्या ५५ लाख असून त्यापैकी ४४ हजार ८०० जणांना बाधा झाली होती.

चित्रपटगृहातील नियम

  • एकाचवेळी ५० प्रेक्षकांना परवानगी
  • दोन प्रेक्षकांतील अंतर एक मीटर
  • चित्रपट संपेपर्यंत मास्क अनिवार्य. अपवाद खाताना
  • एकाच कुटुंबातील किंवा मित्रमंडळीतील पाचपर्यंतचे व्यक्ती एकत्र बसू शकतात.
  • टॉकीजमध्ये प्रवेश करताना थर्मल स्क्रिनिंग
  • सेफ्टीइंट्री ॲप मोबाईलमध्ये बंधनकारक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of opening cinemas in Singapore