Video : अचानक लाइट गेली अन् रोलर कोस्टरवर 35 जण तासभर उलटे लटकले

Universal Studios Japan
Universal Studios Japanesakal
Summary

जपानला (Japan) विकसित राष्ट्र म्हटलं जातं. त्यामुळं इथं सर्व सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.

जपानला (Japan) विकसित राष्ट्र म्हटलं जातं. त्यामुळं इथं सर्व सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, ही बातमी वाचून तुम्हालाही काहीतरी वेगळं वाटेल. खरंतर, वीज नसल्यामुळं जपानमधील एका थीम पार्कमध्ये रोलरकोस्टरवर (Power outage at Universal Studios Japan) 35 लोक एका तासापेक्षा जास्त काळ अडकले होते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही लोक उलटेही लटकले होते. जपानमध्ये विजेची समस्या नगण्य आहे. मात्र, विजेअभावी ही घटना घडलीय.

जपान टाइम्सच्या (Japantimes) वृत्तानुसार, ब्लॅकआउट सुरू असल्यानं लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. जपानमधील ओसाका येथील युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये (Universal Studios Japan) 1 तास सर्व काही थांबलं. या घटनेमुळं लोक प्रचंड घाबरले होते. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. रोलर कोस्टरमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन शिडीचा वापर करण्यात आलाय. सध्या हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरलं होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com