esakal | न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे हादरे; त्सुनामीच्या शक्यतेची दिली सूचना

बोलून बातमी शोधा

new zealand.}

न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्व भागात काल गुरुवारी भुकंपाचे जोरदार झटके बसले आहेत.

न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे हादरे; त्सुनामीच्या शक्यतेची दिली सूचना
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

विलिंग्टन : वेलिंग्टन - न्यूझीलंडमध्ये शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले. अमेरिकेतील भूगर्भ सर्व्हेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी असल्याचं सांगण्यात आलं आहे. नॉर्थ आयर्लंडला या भूकंपाचे धक्के बसले. गेल्या तीन दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. भूकंपाचे केंद्र उत्तर पूर्वेकडील शहर गिसबार्नेपासून 181 किमी अंतरावर आहे. भूकंपाचे धक्के बसले असले तरीही कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.

हेही वाचा - अफगाणिस्तानात दहशतवाद्यांचा रक्तरंजीत खेळ; गोळीबारात 7 कामगारांचा मृत्यू

भूकंपानंतर नूमीमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच किनाऱ्यावरील लोकांना स्थलांतर करण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलंय की तीन मीटर उंचीच्या लाटा फ्रान्सच्या दिशेने येत होत्या. न्यूझीलंडच्या उत्तर द्वीप भागात 8.1 तीव्रतेच्या भूकंपाचे झटके बसले आहेत. याआधी त्याच क्षेत्रात रिक्टर स्केलवर 7.4 आणि 7.3 तीव्रतेचे झटके अनुभवायला मिळाले होते. यानंतर त्सुनामीची सूचना देऊन लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. 

हेही वाचा - 'खिसियानी बिल्ली खंबा नोचे'; राहुल गांधींचा ‘म्हणी’तून भाजपवर निशाणा!

अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार न्यूझीलंडच्या किनाऱ्यापासून 1000 किमी अंतरावर स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.28 वाजता भूंकपाचे हादरे अनुभवायला मिळाले. प्राथमिक पातळीवर भूकंपाची तीव्रता 6.9 असल्याचं पहायला मिळाले आहे. या भूकंपाचे केंद्र जिस्बॉर्न शहरापासून जवळपास 178 किमी दूर 10 किमी खोलीमध्ये असल्याचं सांगण्यात आलंय.