सायबर हल्ल्याच्या शक्यतेने निवडणूक प्रक्रियेला विलंब

निवडणूक प्रक्रियेवर सायबर हल्ल्याच्या शक्यतेने ब्रिटनमधील पंतप्रधान निवडीसाठी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातील निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली
Prime Ministerial election United Kingdom Delay in election process due to possibility of cyber attack
Prime Ministerial election United Kingdom Delay in election process due to possibility of cyber attacksakal
Updated on

लंडन : निवडणूक प्रक्रियेवर सायबर हल्ल्याच्या शक्यतेने ब्रिटनमधील पंतप्रधान निवडीसाठी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातील निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. सायबर हल्लेखोर मतदानात बदल घडवू शकतात, असा अंदाज देशाच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राने (एनसीएससी) व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बोरीस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांच्यात थेट लढत आहे. पाच सप्टेंबरला ब्रिटनच्या नव्या नेत्याची निवड जाहीर होणे अपेक्षित आहे. यासाठी कॉन्झेर्व्हेटिव्ह पक्षात सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यात पक्षाच्या सदस्यांना त्यांनी निवडलेला पर्याय बदलण्याचा पर्याय दिला जाणार होता.

आता सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने सदस्यांना हा पर्याय द्यावा की नाही, याबाबत पक्षाच्या समितीने विचार सुरु केला आहे. तसेच, पक्षाच्या सदस्यांना सोमवारीच (ता. १) मतपत्रिका पाठविल्या जाणार होत्या. मात्र, त्या अजूनही पाठविल्या नसून येत्या काही दिवसांत पाठविणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

‘इस्लामी दहशतवाद मोडून काढू’

ब्रिटनचे नेतृत्व मिळाल्यास इस्लामी दहशतवाद मोडून काढू, असे आश्‍वासन ऋषी सुनक यांनी आज दिले. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिझ ट्रस यांच्यातुलनेत सध्या मागे पडलेल्या सुनक यांनी मतदारांना आकर्षून घेण्यासाठी ब्रिटनसमोरील आव्हानांचा सामना करण्याबाबत आपली भूमिका कणखरपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या ब्रिटनमधील कट्टरतावादी संघटनांना संपविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com