दुबईच्या राजाचा महागडा घटस्फोट; पोटगीत द्यावे लागणार तब्बल ५५४० कोटी | Princess Haya and Dubai sheikh divorce | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sheikh of dubai and princess haya

दुबईचे पंतप्रधान शेख हे ७२ वर्षीय असून त्यांना सहाव्या पत्नीला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून ५५४० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

दुबईच्या राजाचा महागडा घटस्फोट; पोटगीत द्यावे लागणार ५५४० कोटी

जगातल्या सर्वात महागड्या घटस्फोटांमध्ये आणखी एका घटस्फोटाची भर पडली आहे. दुबईचे राजे शेख (sheikh of dubai) यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलांना ५५४ मिलियन पाउंड पोटगी द्यावी असे आदेश युकेच्या न्यायालयाने दिले आहेत. युकेच्या न्यायालयात मंगळवारी या घटस्फोटावर सुनावणी झाली. सध्या ७२ वर्षांचे असलेले शेख मोहम्मद बिन रशीद अल-मख्तून हे दुबईचे राजे आहेत. याशिवाय ते युएईचे पंतप्रधानसुद्धा आहेत. हया बिंत अल-हुसेन (Princess Haya) या शेख यांच्या सहावी पत्नी होत्या. ४७ वर्षांच्या असलेल्या प्रिन्सेस हया या जॉर्डनचे माजी राजे हुसेन यांच्या कन्या आहेत.

शेख मोहम्मद बिन रशीद अल-मख्तून यांना भारतीय चलनानुसार ही रक्कम तब्बल ५ हजार ५४० कोटी रुपये इतकी रक्कम पोटगी म्हणून हया बिंत अल-हुसेन यांना द्यावी लागणार आहे. लंडनमधील न्यायालयाने शेख मोहम्मद अल मकतूम यांना राजकुमारी हया बिंत अल हुसेन यांच्या सुरक्षेसाठी आणि इतर खर्चासाठी तीन महिन्यांच्या आत २५१.५ मिलियन पाउंड द्यावेत असे आदेश दिले आहेत.

शेख आणि प्रिन्सेस हया यांना १४ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा आहे. या दोघांच्यासाठी प्रत्येकी ५.६ मिलियन पाउंड रक्कम डिपॉझिट म्हणून बँकेत ठेवण्यात येणार आहे. मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शेख यांनी ११ मिलियन पाउंड दरवर्षी मुलांच्या शिक्षणसाठी द्यावेत असंही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे. तसंच सुरक्षा म्हणून २९० मिलियन पाउंड रक्कम बँकेत जमा करावी लागणार आहे. घटस्फोटानंतर राजकुमारी हया यांना आर्थिक मदत होईल असं न्यायालयाने म्हटलं आहे.

हया यांना मिळालेल्या पोटगीमध्ये लाखो पाउंड किंमतीच्या दोन संपत्तीच्या देखरेखीसाठीही पैसे दिले गेले आहेत. यात लंडनमध्ये असलेल्या केस्टन पॅलेसजवळची मालमत्ता आणि सुरीमधील एघम यांचा समावेश आहे. शिवाय हया यांच्या नर्ससाठी राहण्यासह जेवणाचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, कुटुंबासाठी गाडी, त्याचा खर्च, पाळीव प्राण्यांच्या खर्चांचासुद्धा या पोटगीच्या पैशांमध्ये समावेश आहे.

टॅग्स :Dubai