महिला तुरुंगरक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कैदी गेला पळून; नंतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prisoner escaped in america

महिला तुरुंगरक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कैदी गेला पळून; नंतर...

कारागृहातून कैदी (Prisoner) पळून जाण्याच्या घटना काही नवीन नाही. अशा बातम्या आपण वृत्तपत्रातून वाचत असतो किंवा टीव्हीवर ऐकत असतो. कैद्याने कारागृहातून पळून जाण्यासाठी कोणती युक्ती वापरली हे आपल्याला माहिती होते. मात्र, ऐका कैद्याने चक्क महिला तुरुंगरक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर तिच्याच मदतीने तुरुंगातून पळ (escaped) काढला. हे प्रकरण अमेरिकेतील अलाबामा तुरुंगातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अटकेच्या भीतीने महिला सुरक्षारक्षकाने स्वत:वर गोळी झाडली. (Prisoner escaped by trapping the female prison guard in a love trap)

डेली मेलच्या वृत्तानुसार, खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने (Prisoner) महिला तुरुंगरक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (trapping) अडकवले. एके दिवशी महिला रक्षकाने कारागृह प्रशासनाला सांगितले की, कैद्याची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याला रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. कारागृह प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर ती त्याच्यासोबत पळून (escaped) गेली.

हेही वाचा: वारांगनांसाठी नवा कायदा लागू; या देशाने दिली मान्यता

एकेदिवशी पोलिसांनी दोघांनाही एकत्र बघितले. यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. अटक होण्याच्या भीतीने महिलेने स्वतःवर गोळी झाडली. कैद्याला (Prisoner) पकडण्यात पोलिसांना यश आले. सुमारे दहा दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर कारागृहातून पळून गेलेल्या कैद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. सध्या या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण अमेरिकेतील अलाबामा तुरुंगातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Prisoner Escaped By Trapping The Female Prison Guard In A Love Trap

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :americaPrisonerescaped
go to top