Russia-Ukraine War | पुतिन यांची 'मेहबुबा' संकटात; बेघर होण्याची वेळ येणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin with his girlfriend
पुतिन यांच्या गर्लफ्रेंडला देशातून हाकलणार? युरोपीय संघ विचारात

पुतिन यांची 'मेहबुबा' संकटात; बेघर होण्याची वेळ येणार?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची कथित गर्लफ्रेंड अलिना कबाईवा हिला युरोपीय संघ प्रतिबंधित करण्याच्या मार्गावर आहे. रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे युरोपीय संघाने प्रतिबंधित व्यक्तींच्या यादीचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाईवा हिचा समावेश आहे. अलिना कबाईवा ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहेत.

अलिनाचा समावेश प्रतिबंधित व्यक्तींच्या यादीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र युरोपीय संघाने अद्याप याबद्दल पुष्टी करणारा अधिकृत प्रस्ताव सादर केलेला नाही. पुतिन यांनी अलिनासोबतच्या नात्यांच्या चर्चा फेटाळल्या आहेत. साधारण दहा वर्षांपूर्वी रशियन प्रीमियर दरम्यान जेव्हा ती जिम्नॅस्ट होती, तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे.

कबाईवा सध्या ३८ वर्षांची असून रशियातली सर्वात लवचिक महिला म्हणून ओळखली जाते. तिने जिम्नॅस्टिक या क्रीडाप्रकारात सुवर्णपदकही पटकावलं आहे. रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार, ती पुतिन यांच्या तीन मुलांची आईसुद्धा आहे.

Web Title: Putin Girlfriend Alina Kabaeva To Be Saction By Eu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top