esakal | नवजात बाळाचा मृतदेह सापडल्याने महिलांना विमानातून उतरवून केली तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

qatar airways main.jpg

एक बेवारस मृत बाळाची आई शोधण्यासाठी आम्ही तपास सुरु केला होता. त्यावेळी महिलांना वेदनादायी प्रकाराला सामोरे जावे लागले.

नवजात बाळाचा मृतदेह सापडल्याने महिलांना विमानातून उतरवून केली तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दोहा- कतारची राजधानी दोहा येथील विमानतळावर स्वच्छतागृहात एका नुकताच जन्मलेल्या बाळाचा मृतदेह मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर कतारहून ऑस्ट्रेलियाला जात असलेल्या कतार एअरवेजची फ्लाइट QR908 थांबवून महिला प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. महिलांना विवस्त्र करुन त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच अनेक तास विमान थांबवून ठेवल्याचा आरोप कतार एअरवेजवर करण्यात आला आहे. दरम्यान, सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्यामुळे अखेर कंपनीने याप्रकरणी खेद व्यक्त केला आहे. 

एक बेवारस मृत बाळाची आई शोधण्यासाठी आम्ही तपास सुरु केला होता. त्यावेळी महिलांना वेदनादायी प्रकाराला सामोरे जावे लागले. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, असे कतार एअरवेजने म्हटले आहे.

हेही वाचा- अमेरिकेच्या स्वयंभू गुरुला 120 वर्षांची जेल; महिलांचे करायचा लैंगिक शोषण

काही दिवसांपूर्वी हमदर्द आंतरराष्ट्रीय विमानतळावर कतारच्या अधिकाऱ्यांनी महिलांना विमानातून बळजबरीने उतरवून त्यांची शारीरिक तपासणी केली होती. सरकारी वेबसाइटने एक निवेदन जारी करुन याप्रकरणी खुलासाही केला होता. गंभीर गुन्ह्यातील एक आरोपी पळण्याचा प्रयत्नात होता. त्यामुळे ही तपासणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे प्रवाशांच्या अधिकारांचे उल्लंघन झाल्याने खेद व्यक्त केला होता. 

हेही वाचा- याला काय म्हणावं! फ्रान्समध्ये नाही पाकचा राजदूत; तरी त्याला परत बोलावण्याचा प्रस्ताव मंजूर

दरम्यान, पंतप्रधान शेख खालिद बिन खलिफा बिन अब्दुलअजीज अल थानी यांनी या प्रकरणाची व्यापक आणि पारदर्शकपणे चौकशी केली जाईल असे सांगितले आहे. आमच्या देशातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची सुरक्षा करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत, असे ते म्हणाले. 

हेही वाचा- ज्योतिरादित्य शिंदेंना 'गद्दार' म्हटल्यानंतर सचिन पायलटांनी दिली प्रतिक्रिया

या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया आणि कतारदरम्यान राजनैतिक संबंध ताणले गेले होते. ऑस्ट्रेलियाने या प्रकाराचा निषेध केला होता आणि मध्य-पूर्व देशांवर आपल्या देशातील नागरिकांबरोबर वाईट वर्तणूक केल्याचा आरोप केला होता.