चीनची चौफेर कोंडी करण्यासाठी भारताने आखलाय मास्टर प्लॅन

 india australia america and japan
india australia america and japan

वाशिंग्टन: प्रशांत महासागरासह हिंद महासागरात डोकेदुखी निर्माण करत असलेल्या चीनला रोखण्यासाठी चार देश एकत्रित येणार आहेत. 'मलाबार नौदल युद्ध सरावा'साठी भारत लवकरच ऑस्ट्रेलियाला निमंत्रित करणार असल्याचे समजते. या निमंत्रणासह अनौपचारिक तयार झालेल्या क्वाड ग्रुप (Quad group) मधील सैन्याच्या सरावाचे चित्र पाहायला मिळेल. यात भारत आणि ऑस्ट्रेलियासह जपान आणि अमेरिकाही सामिल असेल. आतापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियाला या युद्ध सरावापासून बाजूला ठेवले होते. पण लडाखमधील चीनच्या हालचालीनंतर भारत ऑस्ट्रेलियाला आपल्या बाजूने घेत शक्तीप्रदर्शन करण्यास सज्ज आहे.  

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यात भारताकडून  यासंदर्भात ऑस्ट्रेलियाला औपचारिक निमंत्रण प्रस्ताव मिळणे अपेक्षित आहे. यापूर्वी  मलाबार येथे मर्यादित नौदल युद्ध सराव होत असे. मात्र आता या सरावाकडे इंडो-पॅसिफिक महासागरातील एक रणनितीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. हिंदी महासागरात चीनची विस्तारवादी मानसिकतेला लगाम घालण्यासाठी चार देश एकत्र येणार आहेत. 2015 मध्ये या युद्ध सरावात जपान सामील झाला होता. चीनने याकडे वेगळ्या नजरेने पाहिले त्यामुळे 2017 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला यात सहभागी करुन घेण्याचे टाळले होते. पण लडाखमधील भारत-चीन यांच्यातील तणावानंतर भारताने ऑस्ट्रेलियात यात सामील करुन घेण्याचे ठरवले आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टिने चार देशांमधील समुहाचा (Quadrilateral Security Dialogue) युद्ध सराव हा चीनसाठी संयुक्त युद्ध सराव सुरु असल्याचा संदेशच असेल.  

लडाखमधील हिंसाचाराच्या घटनेच्या पूर्वी भारताने चीन सोबतच्या व्यापारी संबंधात संतूलन ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या राष्ट्राशीही चांगले संबंध प्रस्थापित केले. लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील चीनच्या कुरापतीनंतर भारत सरकारने चीन कंपनीच्या देशातील अ‍ॅपला दणका दिला. चीन विरोधात भारत आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेहमध्ये जाऊन भारतीय जवानांशी संवाद साधताना विस्तारवाद आणि विकासवाद अशा शब्दांचा मारा करत चीनला अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. त्यानंतर सागरी सीमेवरील चीनचे आक्रमण थोपवण्यासाठी मोठी रणनिती आखली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com