धक्कादायक ! क्वारंटाईनसेंटरमध्येच सेक्स रॅकेट, अनेकांना कोरोनाची लागण; अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 जुलै 2020

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये कोरोनाच्या संक्रमणाची विचित्र घटना समोर आली आहे. कोरोना रूग्ण आणि संशयितांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू करण्यात आल्याने मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये कोरोनाच्या संक्रमणाची विचित्र घटना समोर आली आहे. कोरोना रूग्ण आणि संशयितांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू करण्यात आल्याने मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मेलबर्नमधील काही हॉटेल्स हे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरले जात आहेत. मात्र आता या हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचं समोर आलं आहे. याबाबत सीएनएनने वृत्त दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील हॉटेलमध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांना ठेवण्यात आलं होतं. मात्र या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू करण्यात आलं. यातूनच अनेकांना कोरोनाची लागण झाली. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. मे आणि जूनच्या सुरुवातीला झालेल्या कोरोना संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे या सेक्स रॅकेटमुळे झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
----------------
जिओमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक; आता कोणी केली गुंतवणूक?
----------------
चांगली बातमी : भारतात कोरोनावरील दुसरी लसही विकसित
----------------

कोरोनामुळे ऑस्ट्रेलियामधील नागरिक आणि कायमस्वरुपी रहिवाशांना देशात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात आल्यावर त्याला १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचा नियम आहे. यासाठी अनेक हॉटेल्समध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ५लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एक कोटीहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine hotel sex scandal linked to coronavirus outbreak in Australian city of Melbourne

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: