Queen Elizabeth Death: निधनाआधीच अंत्यविधीचा प्लॅन होता तयार

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाआधीच त्यांच्या निधनानंतरचे नियोजन केल्या गेले होते
Queen Elizabeth Funeral plan was ready before her death
Queen Elizabeth Funeral plan was ready before her deathesakal
Updated on

Queen Elizabeth: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. एलिझबेथ या ठणठणीत असतानाच त्यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराचा प्लॅन तयार करून ठेवला होता. मागील वर्षी याबाबतची एक रिपोर्ट लिक झाल्याचीही माहिती पुढे आली होती. ब्रिटनमध्ये काय होईल याबाबतचा एक रिपोर्ट लिक झाल्याने ही माहिती पुढे आली होती. ऑपरेशन लंडन ब्रिज रिपोर्टमध्ये राणीच्या निधनानंतर ब्रिटनममध्ये त्यांचे अंत्यसंस्कार, त्यासाठीचा पोलिस बंदोबस्त यांसह सविस्तर अशा नियोजनाची माहिती होती. (Queen Elizabeth Funeral plan was ready before her death)

एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये परिस्थिती कशी असेल? तेव्हा होणाऱ्या संभाव्य गर्दीचे नियोजन आणि अंत्यसंस्कार कशा पद्धतीने होईल याचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला ऑपरेशन 'लंडन ब्रिज' असं कोड नेम देण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. याची माहिती अमेरिकन वृत्तसंस्था 'पॉलिटिकोने' प्रसिद्ध केली होती. यात म्हटल्या गेलं की, राणीचे ज्या दिवशी निधन होईल तो दिवस D-Day म्हणून पाळला जाईल. तसंच राणीच्या निधनानंतर १० दिवसांनी दफनविधी होईल. तसंच अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण करण्याआधी मुलगा प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचा दौरा करतील असेही अहवालात म्हटले गेले.

Queen Elizabeth Funeral plan was ready before her death
Queen Elizabeth II Passes Away : राणी एलिझाबेथ यांचं निधन; ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राणीच्या निधनानंतर दफनविधीपर्यंत काय होईल याचे नियोजन या लीक झालेल्या अहवालामध्ये आहेत. त्यानुसार, राणीची शवपेटी तीन दिवसांसाठी संसदेत ठेवण्यात येईल. तसंच राणीच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणावर लोक लंडनमध्ये गर्दी करतील. तेव्हा तिथे येणाऱ्या लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठीची तयारी, सुरक्षा आणि गर्दीमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचेही नियोजन यामध्ये आहे.

Queen Elizabeth Funeral plan was ready before her death
Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स

लंडनमध्ये राणीच्या निधनानंतर काय परिस्थिती उद्भवू शकते याबाबतही रिपोर्टमध्ये अंदाज व्यक्त केला आहे. राणीचे निधन झाल्यानंतर नविन राजा चार्ल्स हा ब्रिटनच्या चार राष्ट्रांमध्ये दौरा करेल. तसंच राणीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल. विशेष म्हणजे याबाबत ब्रिटिश पंतप्रधानांसोबत एक करार झाल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com