Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Queen Elizabeth

Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स

Queen Elizabeth : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी काल (८ सप्टेंबर २०२२) निधन झाले. त्यांनी एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटन आणि कॉमनवेल्थच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी होत्या. ९६ वर्षीय एलिझाबेथ या सध्याच्या जगातील सर्वात वृद्ध शासक देखील होत्या. त्यांच्या आधी हा विक्रम राणी व्हिक्टोरियाच्या नावावर होता, ज्यांनी १८६७ ते १९०१ पर्यंत सुमारे ६४ वर्षे राज्य केलं होतं.

हेही वाचा: Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबद्दल जाणून घ्या सविस्तर

एलिझाबेथ द्वितीय त्यांचे वडील किंग जॉर्ज पाचवे यांच्या निधनानंतर १९५२ मध्ये ब्रिटनच्या सिंहासनावर बसल्या. २ जून १९५३ रोजी त्यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे वेस्टमिन्स्टर ॲबे येथे झाला. या वर्षी १ जून रोजी एलिझाबेथ यांच्या राजवटीला ७०वर्षे पूर्ण झाली होती.

हेही वाचा: Queen Elizabeth II Passes Away : राणी एलिझाबेथ यांचं निधन; ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राणी एलिझाबेथ यांचा उत्तराधिकारी त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स आहे. चार्ल्स ७३ वर्षांचे आहेत. मात्र, जोपर्यंत राणी एलिझाबेथ जिवंत होत्या, तोपर्यंत चार्ल्स सिंहासनावर बसण्याची शक्यता नव्हती. चार्ल्स यांचा जन्म एलिझाबेथ यांनी सिंहासनावर बसण्याच्या अवघ्या ३ वर्षांपूर्वी झाला होता.

हेही वाचा: Liz Truss : राणी एलिझाबेथ यांच्या भेटीनंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान

राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत १४ ब्रिटीश पंतप्रधान पाहिले आहेत. अमेरिकेच्या १३ राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे.

Web Title: Queen Elizabeth Death Prince Charles Next King Of Britain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :queen elizabeth