
Queen Elizabeth II: राष्ट्रपती मुर्मू लावणार महाराणीच्या अंत्यसंस्काराला हजेरी, लंडनला जाणार
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महाराणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्या 96 वर्षांच्या होत्या. तब्बल 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. सोमवारी राजेशाही इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
त्यांचं पार्थिव लंडनमधील विंडसर येथील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राणी एलिझाबेथ II यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17-19 सप्टेंबर 2022 रोजी राणी एलिझाबेथ II यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी लंडन, युनायटेड किंगडमला भेट देणार आहेत.
तसेच महाराणीच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे 500 परदेशी नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्वांच्या सुरक्षेसाठी परदेशी नेत्यांनाही विमानतळावरून हेलिकॉप्टर सेवा दिली जाणार नाही, असा निर्णय लंडनमध्ये घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला बसने जावं लागेल.