
Queen Elizabeth II : राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अंत्यसंस्कार हा सध्याचा जगभरातील सर्वात मोठा इव्हेंट झाला आहे. त्यांचे ८ सप्टेंबरला निधन झाले होते. तर आज शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना वेस्टमिंस्टर एबी पासून वेलिंगटन आर्च पर्यंत तोफ गाडीतून नेण्यात आले. ही तिच गाडी होती ज्यातून त्यांच्या वडिलांची शवयात्रा निघाली होती.
या तोफ गाडीचे वैशिष्ट्य
सक्रिय सैन्य सेवेतून या तोफ गाडीला बाहेर काढल्यावर सर्व प्रथम त्याचा वापर १९०१ मध्ये महाराणी व्हिक्टोरिया यांच्या अंत्यसंस्कारासाठी करण्यात आले होते.
आता ही गाडी फक्त अशाच कामांसाठी वापरली जाते.
या गाडीतून एडवर्ड-VII, जॉर्ज-V, जॉर्ज-VI (एलिज़ाबेथचे वडिल), माजी प्रधानमंत्री विन्सटन चर्चिल आणि भारतचे शेवटचे व्हाईसरॉय असलेले लुई माउंटबेटन यांच्या अंतयात्रा निघाल्या होत्या.
या गाडीला नौसेनेचा बेस HMS एक्सीलंट मध्ये एका नियंत्रित तापमानात ठेवले जाते. याच्या काळजीसाठी खास फौजींची एक तुकडी असते.
प्रत्येक आठवड्याला एक सैन्य अधिकारी याची चाके फिरवतो. जेणेकरून चाकांचा आकार बिघडणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.