बॉम्बस्फोटानं पाकिस्तान पुन्हा हादरलं; स्फोटात चार जणांचा मृत्यू, 15 जखमी I Pakistan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bomb Blast in Pakistan

पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हल्ल्यांत लक्षणीय वाढ झालीय.

बॉम्बस्फोटानं पाकिस्तान पुन्हा हादरलं; स्फोटात चार जणांचा मृत्यू

Bomb Blast in Pakistan : पाकिस्तानच्या क्वेटा प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात (Bomb Blast in Pakistan) चार जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुरुवारी रात्री हा स्फोट झाला. जिना रोडवरील सायन्स कॉलेजजवळ उभ्या असलेल्या कारजवळ हा बॉम्बस्फोट झालाय. जिन्ना रोड हा क्वेटाच्या प्रमुख मार्गांपैकी एक आहे आणि खरेदीसाठी येथे नागरिकांची मोठी वर्दळ पहायला मिळते. अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा: ड्रॅगनचा विळखा... चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 भागांची नावं बदलली

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना क्वेट्टा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Quetta Civil Hospital) दाखल करण्यात आलंय. स्फोटामुळं (Blast in Pakistan Quetta) जवळपास असणाऱ्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचं सांगितलं जातंय. पाकिस्तानच्या या भागात इस्लामिक स्टेट खूप सक्रिय आहे. याशिवाय, तालिबानचे (टीटीपी) दहशतवादीही (TTP Attack in Pakistan) येथे दररोज हल्ले करतात. पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये (Pakistan Government) हल्ल्यांत लक्षणीय वाढ झालीय.

हेही वाचा: 'यांना' संपवण्यासाठीच राजकारणात प्रवेश केला : योगी आदित्यनाथ

यापूर्वी 18 डिसेंबरलाही इथं स्फोट झाला होता. क्वेट्टाच्या गजबजलेल्या कंधारी मार्केटमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात एक व्यक्ती ठार, तर एक महिला आणि एका मुलासह दहा जण जखमी झाले होते. टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानात सक्रिय असून तिथून ते पाकिस्तानात हल्ले करत आहेत, असं इम्रान सरकारनं म्हटलंय. मात्र, सरकारनं संघटनेवर कोणतीही कारवाई केलेली नाही. सरकारच्या या गोष्टींमुळं सर्वसामान्य नागरिक नाराज असून पीटीआय सरकार दहशतवाद्यांसमोर झुकत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Web Title: Quetta Least Four Dead 15 Others Injured In Pakistans Balochistan Bomb Blast

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PakistanPM Imran Khan
go to top