खान साब तुमची जिद्द नडली! पाक आउट झाल्यावर हे ट्वीट व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan and reham khan

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानच्या पराभवाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इमरान खान यांच्या माजी पत्नी यांनी पाकिस्तानच्या पराभवानंतर ट्विट करुन इमरान खान यांना टोमणा मारलाय.

खान साब तुमची जिद्द नडली! पाक आउट झाल्यावर हे ट्वीट व्हायरल

T-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघावर टीका केली जात आहे. काही खेळाडूंवर चाहते आक्षेपार्ह शब्दात टीका करत आहेत. या सर्व प्रकारानंतर पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) संघातील खेळाडूंच्या बचावासाठी पुढे आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून संघातील खेळाडूंच्या पाठिशी असल्याची भावना व्यक्त केली. पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक राहिली. विजय-पराजय हा खेळाचा भाग असतो, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानी संघाला धीर दिलाय.

एका बाजूला पाकिस्तानच्या पराभवाला काही ठराविक खेळाडू कारणीभूत असल्याची चर्चा रंगत असताना इमरान खान यांची माजी पत्नी रेहम खान (Reham Khan) यांच्या ट्विटचीही चर्चा रंगली आहे. त्यांनी थेट पंतप्रधान इमरान खान यांची जिद्द पाकिस्तानच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: Video: पाकिस्तान हारल्यावर चिमुरडा TV फोडाणरच होता पण...

इमारन खान यांनी कसा दिला धीर?

सेमी फायनलमधील पाकिस्तानी संघाच्या पराभवानंतर इमरान खान (Imran Khan) यांनी एक ट्विट केल आहे. यात त्यांनी लिहिलंय की, बाबर आझम आणि त्याच्या नेतृत्वाखालील टीम सध्याच्या घडीला कोणत्या अवस्थेत असेल याची मला कल्पना आहे. क्रिकेटच्या मैदानात अशा प्रकारच्या निराशेचा सामना मी देखील केला आहे. तुमची कामगिरी अभिमानास्पद आहे, अशा आशयाचे ट्विट इमरान खान यांनी पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर केले होते. यावेळी त्यांनी फायनलमध्ये धडक मारलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदनही केले.

हेही वाचा: T20 World Cup : २०२१ मध्ये मिळणार नवा चॅम्पियन

रेहम खान यांचा इमरान खान यांना टोला

पाकिस्तान संघाचा पराभव झाल्यानंतर इमरान खान यांच्या माजी पत्नी रेहम खान (Reham Khan) यांनी ट्विट केल्याचे पाहायला मिळाले. यात त्यांनी थेट इमरान खान यांना टोला लगावलाय. त्यांनी लिहिलंय की, खान साब... तुम्ही फायनल सामना पाहण्याची इच्छा व्यक्त उगाच केली. तुम्हाला असं करु नका असे म्हटले होते. असा टोला लगावत ते फायनल पाहण्यासाठी तयार झाले त्यामुळेच पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्येच आउट झाला, असा अजब तर्क रेहम खान यांनी लावला आहे. पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहचला तर फायनल पाहण्यासाठी दुबईला जाईन, असे इमरान खान यांनी म्हटले होते. याचाच संदर्भ देत त्यांच्या माजी पत्नी रेहम यांनी त्यांना सुवानले आहे.

loading image
go to top