Rabia Ahsan 92 News Anchor Murder : रावळपिंडीतील '९२ न्यूज'च्या अँकर राबिया अहसान यांच्या हत्याकांडामुळे माध्यम जगतात संताप

Rawalpindi Bedroom Murder : पिस्तूल साफ करताना 'चूकून गोळी सुटल्याचा' पतीचा दावा पोलिसांकडून फेटाळला; हत्येच्या या थरारामुळे पाकिस्तानात महिला पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Famous Pakistani female TV anchor murdered in her home.

Famous Pakistani female TV anchor murdered in her home.

Sakal

Updated on: 

इस्लामाबाद : पाकिस्तानातील प्रसिद्ध वृत्तवाहिनी '९२ न्यूज'च्या (92 News) लोकप्रिय महिला अँकर आणि कार्यक्रम सादरकर्त्या राबिया अहसान (वय ४१) यांची रावळपिंडी येथील राहत्या घरात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या खळबळजनक हत्याकांडानंतर रावळपिंडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत राबिया यांच्या पतीला ताब्यात घेतले असून हत्येसाठी वापरलेले पिस्तूलही जप्त केले आहे.

Loading content, please wait...