'माझ्याशी स्पर्धा करायची असेल तर ४ हजार किमी चालावं लागेल'; राहुल गांधींनी नेमका कुणाला लगावला टोला? वाचा...

Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra : 'माझ्याशी स्पर्धा करायची असेल, तर ४ हजार किलोमीटर चालावं लागेल. पण एवढं चालल्यानंतर लोक तुम्ही माझी नक्कल करत असल्याचं म्हणतील,' असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.
Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra

Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra

esakal

Updated on: 

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात त्यांनी राजकारण, नेतृत्व आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही उदाहरण दिलं. 'माझ्याशी स्पर्धा करायची असेल, तर ४ हजार किलोमीटर चालावं लागेल. पण एवढं चालल्यानंतर लोक तुम्ही माझी नक्कल करत असल्याचं म्हणतील,' असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

Loading content, please wait...