'मन की बात' ऐकविणार नाही; राहुल गांधींचा मोदींना टोला

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

दुबई : तुम्हाला "मन की बात' ऐकविण्यासाठी नव्हे, तर तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि तुमच्या मनातील विचार ऐकण्यासाठी आलो आहे, असे स्पष्ट करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे दाखल झालेल्या गांधी यांनी आज दुबईतील भारतीय कामगारांशी संवाद साधला. 

दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी गांधी यांचे भारतीय समुदायाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यूएईमधील भारतीय कामगारांशी गांधी यांनी आज संवाद साधला. गांधी म्हणाले की, मी येथे "मन की बात' ऐकविण्यासाठी आलेलो नाही, तर तुमच्या समस्या समजून घेण्यासाठी आलेलो आहे. येथे काम करताना भारतीय कामगारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. तुम्ही दिवसभर येथे कष्ट करता आणि भारतातील तुमच्या कुटुंबीयांना पैसे पाठवता. त्यामुळे तुमच्या समस्या जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. 

दुबईत झालेला प्रचंड विकास, मोठमोठ्या इमारती, मोठे विमानतळ, मेट्रो प्रकल्प भारतीय कामगारांच्या योगदानातून प्रत्यक्षात आले आहेत. दुबईच्या विकासासाठी तुम्ही घाम, रक्त आणि वेळ खर्च केला आहे. त्यामुळे तुमचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. मी तुमच्यासारखाच सामान्य माणूस असून, तुमच्या सदैव पाठिशी उभा राहीन, असेही गांधी म्हणाले. भारतात होणाऱ्या आगामी निवडणुकांचा संदर्भ देत ते म्हणाले की, लढाई सुरू झाली असून, ती आपण जिंकणार आहोत. 

काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर तातडीने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात येईल. 
- राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi says, I will not say Man ki Baat in UAE